मुंबई- अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून सणासुदीला ग्राहकांना सवलतीत वस्तू खरेदी देण्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र, दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांनी अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय दिला नसल्याने मनसेने आक्रमक पाऊल घेतले आहे. येत्या सात दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय अॅपमध्ये द्यावा, अन्यथा मनसे स्टाईलने समाचार घेतला जाईल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.
सणाच्या तोंडावर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची मनसेकडून कोंडी; 'हा' दिला इशारा
चुकून झाले असेल तर माफी मागावी व दुरुस्ती करावी. हेतुपरस्पर इतर राज्याची माहिती महाराष्ट्रावर लादली तर आपल्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, त्याची जबाबदारी आपल्यावर राहील, असे मनसेने कंपन्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून अॅपमध्ये दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिले आहे. मात्र, व्यवहार करताना मराठी भाषेचा पर्याय देण्यात आला नाही. मराठी भाषिक ग्राहकांना व मराठी प्रेमींसाठी मराठीत अॅप सुरू करावे, अशी मागणी मनसेने दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे केली आहे. चुकून झाले असेल तर माफी मागावी व दुरुस्ती करावी. हेतुपरस्पर इतर राज्याची माहिती महाराष्ट्रावर लादली तर आपल्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, त्याची जबाबदारी आपल्यावर राहील, असे मनसेने कंपन्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी गुरुवारी अॅमेझॉन व फ्लिपकार्टच्या कार्यालयांना भेट देत मागण्यांचे पत्र दिले आहे.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या ग्राहकांना १६ ऑक्टोबरपासून सवलतीत वस्तू विक्री करणार आहेत. दरम्यान, दोन्ही कंपन्यांकडून मनसेच्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.