मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे ईडी चौकशी कोणी लावली, कोणी लावायला लावली? या सर्वांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
शरद पवारांच्या ईडी चौकशी प्रकरणी भाष्य करताना बाळा नांदगावकर ईडीबाबत बातमी ऐकून पवार यांनी स्वतः चौकशीला सामोरे जाण्याची भावना व्यक्त केली. पवार ईडीकडे जाण्यास निघाले असता पोलिसांना त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेसाठी जावे लागले. पवारांना भविष्यात ईडीच्या चौकशीला बोलावणार की नाही? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलावणार की नाही? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे नांदगावकर म्हणाले.
हेही वाचा -ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे
सर्वांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात अशी भावना नव्हती. हा विरोधकांना संपवण्याचा डाव आहे. पूर्वी विरोधकांनाही सन्मान दिला जायचा, असे म्हणत नांदगावकरांनी ईडीची चौकशीचे आरोप ज्यांच्यावर असतात, ते राजीनामे दिल्यावर इतर पक्षात जातात आणि त्यांना चांगले दिवस येतात, असा टोला त्यांनी पक्ष बदलणाऱ्यांना लगावला.
हेही वाचा -पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही
येत्या 2 दिवसात मनसेच्या उमेदवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचे निवडणूक प्रचार दौरे जाहीर होतील. मनसे 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.