मुंबई -विक्रोळीत शिवसेनेच्या वतीने फेरीवाल्यांना 10 रुपयांच्या पावत्या दिल्या जात आहेत. या पावतीवर शिवसेना शाखा 118 अस लिहिलेलं असून या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच स्थानिक आमदार सुनील राऊत आणि नगरसेवक उपेंद्र सावंत यांचेही फोटो आहेत.
महापालिकेचे काम शिवसेना करत आहे-
जे काम महापालिकेचे आहे ते काम शिवसेना करत आहे. सार्वजनिक पदपंथाचा वापर करणाऱ्यांना उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलन करण्यासाठी आकार, अस या पावतीवर लिहून पैसे वसूल केले जात आहेत.