मुंबई : शनिवारी पुणे येथील झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Sanjay Raut) यांनी संजय राऊत यांच्यावर 'त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी' असे म्हणत डीडीच्या कारवाईवरून टीका केली होती. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande tweet) यांनी राऊतांवर खोचक ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडेंनी 'जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात' अशा आशयाचे ट्विट करून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना चिमटे काढले आहेत.
काय आहे ट्विट ?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट केले असून, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वरील संभाव्य कारवाई संदर्भात वक्तव्य केलं आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, "जेल मध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहींना पुस्तक लागतात. काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील."
सामनाकार रशियन युध्दात मध्यस्थीसाठी रवाना
देशपांडेंनी शनिवारच्या ट्विटमध्ये म्हटले की, "उत्तर प्रदेश आणि गोव्यातील घवघवीत यशानंतर सामनाकार युक्रेन आणि रशियातील युद्धात मध्यस्थीसाठी रवाना. झुकेगा नही साला" उत्तर प्रदेश आणि गोव्यानंतर राऊतांनी युक्रेन आणि रशिया युद्धातील मध्यस्थी म्हणून गेलं पाहिजे असे मनसे नेते देशपांडे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊंतांच्या भूमिकेकडे लक्ष
पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की, "यांचं धोरण राष्ट्रीय आणि लक्ष गल्लीत असं झालं आहे. यांचा डोळा महानगरपालिकेवर आहे आणि यांना पक्ष राष्ट्रीय करायचा आहे, असं होत नाही. या विरप्पन गॅंगच्या कारभारामुळे मुंबईची जगभरात बदनामी होते."पाच राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला. काही ठिकाणी तर सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झालं. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला डिवचलंय आहे. दरम्यान, आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शिवसेना मनसेतील संघर्ष वाढत चालल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -FIR Against Rane Brothers : शरद पवारांवरील आरोप भोवले, राणे बंधूंवर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल