मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मशिदीवरील भोंग्याविषयी भाष्य केले होते. अनधिकृत भोंगे हटवले नाहीत, तर हनुमान चालीसा लावू, असा इशारा ठाकरेंनी दिला ( Raj Thackeray Loudspeaker Controversy ) होता. त्यानंतर राज्यातील राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच आता मनसेच्या चित्रपट सेनेककडून 'भोंगा अजान' नावाचा चित्रपटच प्रदर्शित केला जाणार ( MNS Release Bhonga Movie ) आहे.
'भोंगा अजान' 3 तारखेला होणार प्रदर्शित -मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ( Amey Khopkar ) यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 3 मे ला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना देशपांडे म्हणाले की, "भोंगा या विषयावर राज ठाकरे सातत्याने आपली भूमिका मांडत आले आहेत. हा कोणताही धार्मिक मुद्दा नसून, सामाजिक मुद्दा आहे. हे पटवून देण्यासाठी चित्रपटा सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. याच विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे."