महाराष्ट्र

maharashtra

वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल; मनसेचा इशारा

By

Published : Nov 26, 2020, 5:46 PM IST

कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

mns
मनसे

मुंबई -कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणी वीजबिल भरू नका आणि जर वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

सरकारला हा अंतिम इशारा -

वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने आज राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले होते. वाढीव वीजबिलांनी त्रस्त झालेल्या जनतेला न्याय देण्यासाठी आज मनसेतर्फे बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकार या प्रश्नावर गंभीर दिसत नाही. या कारणास्तव आज बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेतर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. तसेच सरकारला हा अंतिम इशारा असल्याचे मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही सर्वसामान्यांचे म्हणणें मांडले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. यापुढे जर वाढीव बिल आणि बिल भरले नाही म्हणून वीज कापायला आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असे देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा -नागपुरात मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक, तर ऊर्जामंत्र्यांची केंद्रावर टीका

हेही वाचा -औरंगाबाद : परवानगी नाकारल्यानंतरही मनसैनिकांची वीजबिलाविरोधात आंदोलनाची भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details