महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे घरातून पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्याकडे जाताना ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. उद्या औरंगाबादकडे निघणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद मध्ये मनसेची जंगी सभा होणार आहे. राज ठाकरेंसोबत मुंबईसह पुण्यातील कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना

By

Published : Apr 29, 2022, 1:33 PM IST

Updated : Apr 29, 2022, 3:11 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे घरातून पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्याकडे जाताना ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. उद्या औरंगाबादकडे निघणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद मध्ये मनसेची जंगी सभा होणार ( Aurangabad MNS Rally ) आहे. राज ठाकरेंसोबत मुंबईसह पुण्यातील कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे.

औरंगाबादेतील सभेला परवानगी - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली ( Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally ) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.

राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना होताना

12 रेल्वेची मागणी - राज ठाकरे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 रेल्वे देण्याची मागणी मनसैनिकांनी केली आहे. तर जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिक हे आयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती देखील यावेळी वागस्कर यांनी यावेळी दिली. तर औरंगाबादेत होणाऱ्या सभेसाठी पुण्यातून 100 ते 150 गाड्यांचा ताफा हा ठाकरे यांच्याबरोबर औरंगाबाद येथे जाणार आहे. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

हेही वाचा -CM Meeting With Shiv Sena MPs : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना खासदारांसोबत तातडीची बैठक, 'या' विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

Last Updated : Apr 29, 2022, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details