मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे नागपूरमधून करणार आहेत. सुरुवातीला विदर्भाचा आढावा घेऊन राज ठाकरे यांचा ताफा पुढे सरकेल. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांची खलबते सुरू झालीत. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेते व सरचिटणीसांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत नेमकं काय ठरलं काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र त्यानंतर आता लगेचच 16 तारखेला मनसेची आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे.
ती माहिती मी नाही देऊ शकत -आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सत्र घेत असल्याच्या चर्चा आहेत (Sandeep Deshpande reaction MNS continuous meetings). याबाबत माहिती देताना संदीप देशपांडे म्हणाले की, त्यादिवशी जी पक्षाची बैठक झाली ती अत्यंत अंतर्गत विषयावरती बैठक होती. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही.
मनसेची BMC त 227 जागांची तयारी - यासोबतच मनसे व शिंदे गट एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार अशा चर्चा होत्या यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, तुमच्या या संदर्भातील बातम्या आम्ही देखील पाहतोय पण या निवडणुकी संदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी सध्या तरी आमची सुरू आहे (MNS preparation for self reliance). काही माध्यमांवरती शिंदे गट आणि मनसे एकत्र लढून भाजप त्याला छुपा पाठिंबा देईल अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. पण, यावरती एकच सांगतो आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात भाजप नाही. याआधी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वांच्या सर्व 227 जागा लढवल्या होत्या आता देखील आमची याच २२७ जागा लढवण्याची आमची तयारी सुरू आहे. अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
आगामी निवडणुका आणि राज ठाकरे यांचा दौरा -राज ठाकरे त्यांच्या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासोबतच शिवसेनेसह महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरेंनी केली आहे. स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 17 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरू होतोय.