मुंबई - आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्तमुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात मनसेचा पाडवा मेळावा ( MNS Padwa Melava at Shivaji Park ) होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लाखो कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत मनसेचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. याच मेळाव्यानिमित्त आलेले पालघरचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी केलेल्या देखाव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भ्रष्टाचाराचा आसूड - तुळशी जोशी यांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांना एकाला काळा रंग लावलाय तर दुसऱ्याला पूर्ण भगवा रंग लावला आहे. काळा रंग लावलेल्या कार्यकर्त्यावर भ्रष्टाचारी सत्ताधारी असे लिहिले असून भगवा रंग लावलेल्या कार्यकर्त्याच्या अंगावर एक संधी मनसेला द्या असे लिहिले आहे. हा भगवा रंग लावलेला कार्यकर्ता काळ्या रंगाच्या कार्यकर्त्याला चाबकाने म्हणजेच भ्रष्टाचाराला चाप मारतोय असे दाखवण्यात आला आहे.