मुंबई : तिथीनुसार शिवजयंती निमित्त मनसेकडून मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात तालमंत्र या ढोल ताशा पथकाने देखील सहभाग घेतला होता. आणि याच ढोल-ताशा पथकातील सदस्य असलेला सलमान हा संपूर्ण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. एकीकडे देशात हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण वाढत असताना सलमानने या जयंती सोहळ्यात केलेलं वादन सध्या चर्चेत आहे.
विविध क्षेत्रातील तरुणांचा तालमंत्र
या ढोल पथकात जवळपास शंभर तरुण तरुणींचा सहभाग आहे. हे सर्वजण विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यातील काही जणांचा व्यवसाय आहे, काही जण खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत, तर काहीजण शिक्षक सुद्धा आहेत. हे सर्वजण एकत्र येत मागील सहा ते सात वर्षापासून ढोल वादन करत आहेत.