मुंबई- प्रवीण चौगुले या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या तरुणाने उचलेल्या आत्महत्येच्या पावलानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका न घेण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. तसेच या तरुणाची मनसे नेत्यांनी समजूत काढली आहे. युवकांनी काही चुकीचे पाऊले उचलल्यास राज ठाकरे यांना वाईट वाटेल, याची जाणीव करून दिल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
चुकीचे पाऊल उचलल्यास, राज ठाकरेंना वाईट वाटेल; मनसे नेत्यांनी काढली 'त्या' तरुणाची समजूत - ED notice to raj thakare
तरुणाने उचलेल्या आत्महत्येच्या पावलानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका न घेण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. तसेच या तरुणाची मनसे नेत्यांनी समजूत काढली आहे. युवकांनी काही चुकीचे पाऊले उचलल्यास राज ठाकरे यांना वाईट वाटेल, याची जाणीव करून दिल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसे नेते संदीप देशपांडे
मनसे हा एक परिवार आहे. राज ठाकरे यांना ईडीच्या आलेल्या नोटीसीमध्ये सरकारला काहीही सापडणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शांत राहण्याची विनंती केली आहे. याचप्रकारची विनंती मी माझ्या सर्व मनसे सहकाऱ्यांना करतो की, त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्त्यांचा तळतळाट हा या सरकारला जाणावा लागेल, असे देशपांडे यांनी सांगितले.