मुंबई - शहराची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुरू करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज 'सविनय कायदेभंग' आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी सकाळीच रेल्वे प्रवास केला. यानंतर रेल्वे प्रवास केल्याचा आपला व्हिडिओही त्यांनी प्रसारित केला आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना काल मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली होती. नोटीसीविरोधात रेल्वेने प्रवास केल्यास, कायदेशीर कारवाई करू असा इशाराही रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला होता. मात्र आंदोलनावर ठाम असणाऱ्या देशपांडे यांनी आज रेल्वे प्रवास केला आहे.