मुंबई -वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बेस्ट इलेक्ट्रिकल व्यवस्थापनने गेल्या चार वर्षात २ हजार ४९० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. मग युनिटचे दर का वाढले जात आहेत,असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वीज दरवाढीवरून प्रशासनावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, की बेस्टने एमएआरसीकडून खर्च वाढला अस सांगून वीजेच्या युनिटचे दर वाढवून घेतले आहेत. बेस्ट विद्युत विभागाने कामगारांना त्यांची थकबाकी दिली नाही. बेस्टच्या सबस्टेशनची दुरुस्ती केली नाही. मग यांना खर्च कोणता आहे? हे सर्व खोटे सुरू आहे. बेस्ट विद्युत विभाग असे का करत आहे? इतर खासगी विद्युत कंपन्या काय करत असतील याचा विचार करावा लागेल. बेस्टने खोटा खर्च दाखविला आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचा-१ हजार ८८७ कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीची मंजुरी