मुंबई - पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले असून, जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याला जबाबदार असल्याचा आरोप देशपांडे यांनी सोशल मीडियावर केला आहे.
'सरकारच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाला. तुम्ही यंत्रणा नीट चालवत नाही. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. ती जबाबदारी त्यांना पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. तुम्हाला घरी बसवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री केलेलं नाही.' अशा शब्दांत मुख्यमंत्री व राज्य शासनावर देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे.