मुंबई -मुंबई मनपामध्ये विरप्पन गॅंगने ४० कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भातील पुरावे मनसेकडे ( BMC School Tablet Scam ) आहेत. यासंदर्भात रितसर आयुक्त स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मुंबई महापौरांना ( MNS Critisize Mumbai Mayor Kishori Pednekar ) हा घोटाळा दिसणार नाही. त्यांनी चष्म्याचा नंबर बदलावा, असा टोलाही त्यांनी यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांना लगावला. दादर ( MNS Sandeep Deshpande PC ) येथील कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'पुराव्यानिशी चौकशीची मागणी करणार' -
मुंबई महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता टॅब खरेदी केली जाते. यंदा सुमारे ४० हजार कोटींचे टॅब खरेदी केली जाणार आहे. स्थायी समितीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला आहे. तो मंजूर होण्यापूर्वी सहा वेळा त्यात बदल करण्यात आला. ओळखीच्या कंपनीकडून टॅब खरेदीसाठी सगळा खटाटोप सुरु आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. टॅबमध्ये कुठल्या सुविधा हव्यात, कोणत्या नाहीत, याच वर्गीकरण झालेले नाही. एकाच दिवसांत निविदा प्रक्रिया पार पडली आहे. येत्या मार्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होतील. परंतु, परिक्षेपूर्वी टॅब मिळतील का, याबाबत साशंकता आहे. जे टॅब दिले जाणार आहेत, त्यात केवळ अभ्यासक्रम आहे. इतर कोणत्याही सुविधा नाहीत. नव्या शिक्षण पद्धतीनुसार त्यात सुधारणा असायला हवी होती. मात्र, त्यात तसे काहीही नाही. मुंबईकरांना दाखवण्यासाठी टॅबचे वाटप केले आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त स्तरावर चौकशीची मागणी करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
'भ्रष्टाचारा करायला अक्कल लागते' -