महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2012 नंंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का?- मनसे नेते संदीप देशपांडे

दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, असा टोला लगावत २०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे

By

Published : Aug 10, 2021, 3:17 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होऊन पंधरा महिने झाले आहेत. या पंधरा महिन्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री यांनी त्यांच्या आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. मात्र यावर मनसेने टीका केली आहे. दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, असा टोला लगावत २०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राजसाहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी? असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

संदीप देशपांडे यांनी केलेले ट्विट
काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे यांनी आमदार निधीचा पहिल्यांदा वापर केलेला आहे. या निधीतून शिवाजी पार्क परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना पत्र लिहले होते. माझ्या आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी देत आहे, असे म्हटले होते. सामान्यपणे एखाद्या कामासाठी आमदार २५ लाखांपर्यंतचा निधी देऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये विशेष सवलतीअंतर्गत १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सी रामचंद्र चौक ते वीर सावरकर मार्गावरील वसंत देसाई चौकादरम्यानच्या फुटपाथचे सुशोभीकरणासाठी या निवादा मागवण्यात आले आहे. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाईची काम केली जाणार आहेत. शिवाजी पार्कच्या अगदीसमोर असलेल्या संयुक्त महाराष्ट्र गॅलरीचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. ही गॅलरी उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. २०१० साली बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या गॅलरीचे लोकार्पण करण्यात आले होते. या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंनी काढलेले अनेक फोटो आहेत. या ठिकाणी मिनाताई ठाकरेंचेही स्मारक आहे. या स्मारकाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details