मुंबई - राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचे नियम कडक करण्यात येत आहेत. असे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मात्र मी मास्कच घालत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मी मास्क घालतच नाही; राज ठाकरेंचे माध्यम प्रतिनिधींना उत्तर - मनसे नेते राज ठाकरे
राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. विविध प्रश्नांवरून अनेक पक्षांचे, संघटनांचे लोक राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात.
हे तुम्हालाही सांगतोय-
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यक्रमस्थळी गर्दी असणार हे माहिती असतानाही तोंडाला मास्क लावलेला नव्हता. यावर 'तुम्ही मास्क घातलेला नाही', अशी विचारणा केली असता, 'मी मास्क घालतचं नाही, हे तुम्हालाही सांगतोय', असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.
कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बहुतेकांनी मास्क लावलेला होता. परंतु राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. साहजिकच माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले. राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. विविध प्रश्नांवरून अनेक पक्षांचे, संघटनांचे लोक राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात. राज ठाकरे हे देखील त्यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करत असतात. परंतु राज ठाकरेंनी तिथेही मास्क लावलेला दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मास्क न वापरण्याच्या भूमिकेवरून जनतेमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली पाहालया मिळते.