महाराष्ट्र

maharashtra

'अनिल परबांच्या राजकीय आशीर्वादामुळेच अटक, त्यांचा सीडीआर तपासा'

By

Published : Mar 24, 2021, 4:00 PM IST

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि शैलेश पाटील यांच्या संगनमताने आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी परब यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी चित्रे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

minister anil parab
minister anil parab

मुंबई -राज्यात दररोज नव्या प्रकरणाची भर पडत आहे. सध्या हप्ता वसुलीच्या आरोपमुळे महाविकास आघाडी राज्य सरकार गोत्यात आले असताना, आता मनसेच्या नव्या प्रकरणाची यात भर पडली आहे. वांद्रे खेरवाडीतील एका सोसायटीत चालणाऱ्या स्पा केंद्राला विरोध केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्यासह दोघांना अटक केली. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि शैलेश पाटील यांच्या संगनमताने आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी परब यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी चित्रे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

'वीजपुरवठा खंडित केला'

वांद्रे पश्चिमेकडील खेरवाडीतील गांधीनगर इमारतीत बेकायदेशीर स्पा केंद्र चालते. स्थानिकांचा या केंद्राला तीव्र विरोध आहे. स्थानिक प्राधिकरण आणि पोलिसांकडे याबाबत सातत्याने तक्रार करण्यात आली. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट स्पा मालकाने २ जानेवारीला ३५ इमारतींचा वीजपुरवठा खंडित करून रहिवाशांना अंधारात टाकले. या प्रकरणी विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, शिवसेनेच्या नेत्यांकडून दमदाटी आणि धमकीचे फोन येऊ लागले.

'राजकीय आशीर्वादामुळेच अटक'

पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी माझ्यासह दोघांना अटक केली, असा आरोप मनसेचे अखिल चित्रे यांनी केला आहे. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या राजकीय आशीर्वादामुळे मला अटक झाली आहे. त्यामुळे मंत्री परब यांचे सीडीआर तपासण्यात यावेत, अशी मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे केल्याचे चित्रे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details