मुंबई -कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र व देश संचारबंदीत असताना आपले पोलीस कर्मचारी, बँक कर्मचारी, साफसफाई कर्मचारी आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी हे दिवस-रात्र काम करून लोकांची सेवा बजावत आहेत. या अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलीस, शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे.
पोलीस, शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मनसेचा मदतीचा हात - news about mns
सर्वजणांनी सुरक्षित घरी राहावे म्हणून गेले कित्येक दिवस रस्त्यावर उभे राहून पोलीस गस्त घालत आहेत. या अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलीस, शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे.
सर्वजण सुरक्षित घरी राहावे म्हणून गेले कित्येक दिवस रस्त्यावर उभे राहून, गस्त घालून पोलीस मुख्य रस्त्यावर, नाक्यानाक्यावर, गल्लीबोळात आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. वेळ पडलीच तर हेच पोलीस एखाद्याला वैद्यकीय सेवा पुरविताना दिसत आहेत, तर कोणाला अन्न दान करताना दिसत आहेत. पोलीस नावाचा आमचा हा पाठीराखा कोरोना विषाणूच्या जैविक युद्धात सहीसलामत व सुरक्षित राहिला पाहिजे हे आम्ही सर्वानी आपले कर्त्यव्य समजले पाहिजे. या भावनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे व मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी त्यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईतील कोरोनाचा जास्त प्रभाव असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पी.पी.इ) किट्सचे वाटप केले. अंधेरी, सहार, पायधुनी, ना.म.जोशी, साकीनाका, विक्रोळी, पंतनगर, गोरेगाव, देवनार, कांजूरमार्ग, एम.आय.डी.सी या पोलीस ठाण्यात आजपासून प्रायोगिक तत्वावर या किट्सचे वाटप केले आहे.