मुंबई - लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र विरोध केला आहे. मनसेने देखील या बंदवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Maharashtra Bandh : संसदेत कृषी विधेयक मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? - मनसे - महाआघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक
लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा शेतकरी कायदा संसदेत पास झाला त्यावेळी महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा शेतकरी कायदा संसदेत पास झाला त्यावेळी महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? हे महाविकास आघाडीने सांगावे, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा -ठरलं! शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार
भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे. हा योगायोग नाही. ज्यावेळी भाजप चुकले तेव्हाही राज ठाकरे भाजप विरोधात बोलले आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.