महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टोल वाढ ही जनतेची पिळवणूक - मनसे - mns on toll hike news

मुंबईच्या पाचही प्रवेशद्वाराजवळील टोलच्या दरात 1 ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे.

toll
टोलनाका

By

Published : Sep 25, 2020, 8:45 PM IST

मुंबई - टोल वाढीचा मुद्दा आज समोर आला आहे. त्याबाबत राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार आहोत. टोल वाढ ही एक पिळवणूक आहे. कोरोनामुळे अगोदरच सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलं आहे. या अगोदरही मनसेने टोल वाढीबद्दल आंदोलन केली होती. टोल वाढीला मनसे समर्थन करणार नाही. अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

नितीन सरदेसाई - मनसे नेते

मुंबईच्या पाचही प्रवेशद्वाराजवळील टोलच्या दरात 1 ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील.

असे असतील टोलचे नवीन दर

• छोटी वाहनं - आधी 35 रुपये, आता 40 रुपये (5 रुपयांची वाढ)
• मध्यम अवजड वाहनं - आधी 55 रुपये, आता 65 रुपये (10 रुपयांची वाढ)

• ट्रक-बसेस - आधी 105 रुपये, आता 130 रुपये (25 रुपयांची वाढ)

• अवजड वाहनं - आधी 135, आता 160 रुपये (25 रुपयांची वाढ)

• हलक्या वाहनांचा मासिक पास - आधी 1400 रुपये, आता 1500 रुपये (100 रुपयांची वाढ)

ABOUT THE AUTHOR

...view details