महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ओव्हरलोडींग वाहनांवर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करा, मनसेची परिवहन आयुक्तांकडे मागणी - मनसे नेते संजय नाईक

राज्यभरात धावणाऱ्या ट्रक, डंपर, कंटेनर, बसेस मधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग वाहनांविरोधात ( Overloading Vehicles ) थातुर-मातुर कारवाई न करता नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने परिवहन आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 4, 2022, 9:04 PM IST

मुंबई- राज्यभरात धावणाऱ्या ट्रक, डंपर, कंटेनर, बसेस मधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग वाहनांविरोधात ( Overloading Vehicles ) थातुर-मातुर कारवाई न करता नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने परिवहन आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. तसेच या मागणीवर पोलीस अधीक्षक, मुख्य सचिव आणि परिवहन आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करून आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याचे आवाहन मनसेने परिवहन आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दंडात्मक थातुरमातुर कारवाई नको

मनसे नेते संजय नाईक यांनी सांगितले की, वाहनाच्या क्षमतेहून अधिक भार वाहून नेणाऱ्यांवर थातुरमातुर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे या कारवाईला न जुमानता माल वाहतूक वाहने सर्रासपणे क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करत आहेत. परिणामी, रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांसह पादचाऱ्यांचाही जीव धोक्यात घातला जात आहे. याशिवाय ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांचीही हानी होत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी 21 डिसेंबरला अधिक भार वाहतूक ( Overloading Vehicles ) करणाऱ्या वाहनास पकडून देत कारवाई करण्यास भाग पाडल्याने संबंधित वाहन मालक आणि त्याच्या साथीदारांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ले केले होते. तसा शिवडी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने दंडात्मक कारवाई पुरते मर्यादीत न राहता ओव्हरलोडींग वाहनांवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी मनसेच्या वाहतूक शाखेने केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची मागणी

ओव्हरलोडींग वाहनांवरील कारवाईसह इतर अनेक मुद्द्यांवर मनसेच्या शिष्टमंडळाला परिवहन आयुक्तांसह पोलीस अधीक्षक, परिवहन सचिव आणि मुख्य सचिवांसोबत चर्चा करायची आहे. त्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची मागणी मनसेने केली आहे. या बैठकी वाहन चालकांसह वाहन मालक आणि माल वाहतूकदार यांचेही प्रश्न मांडणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -वॉटर टॅक्सी गाठण्यासाठी मुंबईकरांना मिळणार २०० स्थानिक टॅक्सींची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details