मुंबई- अनेक दिवस लागले लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. राज्यात रुग्णांची देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी द्या - मनसे
राज्यात रुग्णांची देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.
14 जिल्हे रेड झोनमध्ये
लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल सोमवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
१८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार
राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. परंतु अद्यापही १८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला आहे. तसेच मुंबईतही कोरोनाबाधितांचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. लोकल प्रवासास परवानगी दिल्यानंतर नागरिकांची प्रचंड गर्दी वाढेल, यामुळे लोकल प्रवासाची परवानगी मिळते का नाही याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
रुग्णाची वाढती संख्या पाहता राज्य शासनाने
महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावला आहे. १ जूननंतर लॉकडाऊन उठणार का? अशा चर्चा लोकांमध्ये सुरू आहेत. मात्र सध्या रुग्णाची संख्या घटत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाउन शिथिल करण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहे. मुख्यतः राज्य सरकार राज्यातील कडक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे समजते. रेल्वे सेवा ही काही लवकर सुरू होणार नाही असे चित्र सध्या तरी दिसत आहे.