महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'जेम्स' श्वानाचा मृत्यू - मनसे प्रमुख राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या 'जेम्स' या श्वानाचे वय साडेबारा वर्ष होते. मागील काही दिवसांपासून त्याला चालायला त्रास होत होता. वयोमानानुसार सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब श्वानप्रेमी आहे. त्यामुळेच लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते.

जेम्स श्वानाचे झाले निधन
जेम्स श्वानाचे झाले निधन

By

Published : Jun 29, 2021, 5:23 PM IST

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे श्वानप्रेम सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या जेम्स नावाच्या श्वानाचा सोमवार रात्री मृत्यू झाला आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: मुंबईतील परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत उपस्थित होते. यावेळी लाडक्या जेम्सला निरोप देताना राज ठाकरे भावुक झाले होते.

जेम्स श्वानाचे झाले निधन

वय साडेबारा वर्ष

राज ठाकरे यांच्या 'जेम्स' या श्वानाचे वय साडेबारा वर्ष होते. मागील काही दिवसांपासून त्याला चालायला त्रास होत होता. वयोमानानुसार सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब श्वानप्रेमी आहे. त्यामुळेच लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते.

राज ठाकरे झाले भावुक

राज ठाकरे आणि 'जेम्स' यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून राज ठाकरेंना जेम्सचा किती प्रेम होते हे दिसते. त्यामुळे आपल्या लाडक्या जेम्सच्या जाण्याने राज ठाकरे भावुक झाल्याचे पहायला मिळाले. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉण्ड आणि शॉन आधी गेले. त्यानंतर आता 'जेम्स'च मृत्यू झाला.

हेही वाचा -'मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की',अमेय खोपकर यांनी केलं ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details