महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS chief Raj Thackeray राज ठाकरे यांच्या इंजिनाला नवे डबे जोडले जाणार का ?

MNS chief Raj Thackeray मनसे प्रमुख राज ठाकरे MNS chief Raj Thackeray यांच्यावर नुकतीच एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शास्त्रक्रियेनंतर आता राजकीय शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर Raj Thackeray on Vidarbha tour जाणार आहेत. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकार Shinde and Fadnavis Govt स्थापन झाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुका Municipal Elections लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MNS chief Raj Thackeray
MNS chief Raj Thackeray

By

Published : Sep 15, 2022, 4:07 PM IST

मुंबईमनसे प्रमुख राज ठाकरे MNS chief Raj Thackeray यांच्यावर नुकतीच एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शास्त्रक्रियेनंतर आता राजकीय शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर Raj Thackeray on Vidarbha tour जाणार आहेत. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकार Shinde and Fadnavis Govt स्थापन झाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुका Municipal Elections लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी इतिहास 17 सप्टेंबर पासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे.

नाशिक, पुण्यानंतर नागपूर का ?राज्यातील महत्त्वाची आणि मोठी शहरे काबीज करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्याचे कारणही तसेच आहे कारण राज ठाकरे यांना शहरी भागातील तरुणाईचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. राज ठाकरे यांच्या भाषणांना आणि त्यांच्या विचारांना तरुणाई मधून नेहमीच प्रतिसाद मिळत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र असे असले तरी राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होणारे मतदार मतपेटीत मात्र त्यांच्या बाजूने उभे राहताना दिसत नाहीत. हे दृष्टचक्र तोडण्यासाठी आता विदर्भाकडे राज ठाकरे यांनी आपली नजर वळवली आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला लक्ष्य केले आहे.

डबे जोडण्यासाठी जाणार ?राज ठाकरे हे विदर्भात जाऊन काय साध्य करणार, असा प्रश्न विचारतात राज ठाकरे यांनी सांगितले होते. विदर्भात जाऊन नवे डबे जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी राज ठाकरे यांनी नागपूर, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणे आणि पक्ष संघटना कशा पद्धतीने वाढविता येईल यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपला पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करणे हे राज ठाकरे यांचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई पुणे आणि नाशिक या शहरांप्रमाणे अजूनही विदर्भात प्रतिसाद मिळत नाही. तो अधिक मिळावा आणि नागपूर सारख्या शहरासह अमरावती विभागातूनही मनसेला बळकधी मिळावी. यासाठी राज ठाकरे यांनी हा दौरा आखला आहे. या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच विदर्भातील जनता अथवा विदर्भातील नव मतदार राज ठाकरे यांना पसंती देणार का ? हे आगामी निवडणुकांच्या माध्यमातूनच स्पष्ट होईल.

कसा असेल राज यांचा दौराराज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर सतरा तारखेपासून जाणार आहेत. 17 सप्टेंबरला ते मुंबईहून रेल्वेने नागपूरला पोहोचतील. 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर रोजी नागपूर येथे पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत, तर 20 सप्टेंबर रोजी एक दिवस चंद्रपूर दौऱ्यावर जाणार आहेत. चंद्रपुरातून पुन्हा नागपूरला आल्यानंतर 21 तारखेला राज अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहे. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी अमरावती मधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि बैठका झाल्यानंतर 23 तारखेला राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईकडे परतणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details