महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Maharashtra Daura : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर - मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

आगामी निवडणुका लक्षात घेता मनसे (MNS) देखील जोमाने कामाला लागली आहे. पुन्हा एकदा मनसेची ताकद निर्माण करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) जोर लावताना दिसत आहेत. आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक (MNS Leaders Meeting) झाली. यात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा (Raj Thackeray Maharashtra Daura) निश्चित झाला आहे.

MNS chief Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By

Published : Dec 3, 2021, 4:52 PM IST

Updated : Dec 3, 2021, 5:33 PM IST

मुंबई - राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता मनसे (MNS) देखील जोमाने कामाला लागली आहे. पुन्हा एकदा मनसेची ताकद निर्माण करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) जोर लावताना दिसत आहेत. आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक (MNS Leaders Meeting) झाली. यामध्ये पुढील रणनिती ठरवण्यात आली आहे. राज यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित (Raj Thackeray Maharashtra Doura) केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. यावेळी त्यांनी एक सूचक वक्तव्य करत लवकरच एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी मिळेल असे देखील सांगितले.

माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर
  • कसा असेल राज ठाकरे यांचा दौरा -

मनसेच्या प्रमुख नेत्यांची आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तारखा ठरल्या असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

6 डिसेंबरला पुण्यात पदाधिकारी बैठक आहे. 14 डिसेंबरला मराठवाडा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक असणार आहे. 16 डिसेंबरला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. कोकणाबाबत तारीख ठरायची आहे.

  • अयोध्येला जाण्याची तयारी पूर्ण -

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्या येथे जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा दौरा लांबणीवर पडला होता. या दौऱ्यावर देखील निर्णय झाला आहे. फक्त तारीख निश्चित करायची बाकी आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले. आमची अयोध्येला जायची तयारी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Dec 3, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details