मुंबई - सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देशाचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. त्यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार आणि ७ कोटी रूपये असं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील डिसले यांचे कौतुक केलं आहे.
शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या उल्लेखनिय कामाचे कौतुक राज यांनी देखील केलं आहे. 'युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.' अंस ट्विट राज ठाकरे यांनी केलं.
पुरस्काराच्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देणार-
क्यू आर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून फक्त राज्याचे नवे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती त्यांनी त्यांच्या कार्यातून केली आहे. त्यांच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार माढा तालुक्यातील परितेवाडी येथील शिक्षक रणजीत डिसले यांना मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. हा पुरस्कार मिळवणारे रणजीत हे भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.