- देशातील मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजे. आमची सभा घेताना परगवानगी का लागते. रस्त्यावर येऊन नमाज पठणाची परवागनी कोणी दिली, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच ईदच्या दिवसात मला विष कालवायचे नाही. 4 तारखेनंतर भोंगे उतरवले नाही. हनुमान चालीसा वाजवेल, असेही राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Sabha : शरद पवार यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी, राज ठाकरेंची टीका - Raj Thackeray Rally Rules
20:48 May 01
20:44 May 01
20:41 May 01
- मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत, मुस्लीम समाजाने या गोष्टी समजावून घ्यावे.
20:35 May 01
- माझ्या आजोबांचं चरित्र आहे 'माझी जीवनगाथा'. त्यावर पान क्रमांक १०१ वर म्हटलं आहे, हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते, त्यांची पुस्तकं वाचावी, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
20:32 May 01
- राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीचे राजकारण सुरू झाले. माझा मराठा बांधव भगिनी यांची माथी भडकवायची, असेही राज ठाकरे म्हणाले.
20:30 May 01
शरद पवार कधीच सभांमध्ये शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत
राज ठाकरेंचे भाषण आहे, घोषणाबाजी करा आणि निघून जा एवढंचे येते आपल्याला. पवार साहेब आपण जातीजातीमध्ये जो द्वेष निर्माण करतात, त्यामुळे तेढ निर्माण होतो. आतापर्यंतच्या सभा काढा शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. आता मी हा विषय काढल्यावर शरद पवार हे सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेईला लागले.
20:29 May 01
नास्तिक बोलल्यावर शरद पवारांना झोंबले
सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या की शरद पवार हे नास्कित आहेत. अजून पुरावा काय पाहिजे. शरद पवार म्हणाले होते की राज ठाकरे यांनी आजोबांचे पुस्कते वाचायला पाहिजेत. पवार साहेब आमच्या आजोबांनी वस्तूस्थितीवर लिहिले आहे, तुमच्यासारख्या जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारे नाही.
20:29 May 01
20:24 May 01
- माझे आजोबा हे भटभिक्षुकांच्या विरोधात होते, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका
20:20 May 01
- आमच्या अंगात शिवाजी आला पाहीजे, ही आमची मराठे शाही. आमच्या महाराष्ट्राची आब्रु वेशीवर टांगली आहे. राज्यातील नेते वाटेल ते बोलत आहेत. महाराष्ट्राने देशाला विचार दिला. हा महाराष्ट्र चाचपडतोय. रोज महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. असा महाराष्ट्र दिन साजरा करायचा का? असे, राज ठाकरे म्हणाले.
20:12 May 01
- महाराष्ट्राचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
- संभाजीनगरचं मूळ नाव खडकी आहे. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याआधी पैठण, असे राज ठाकरे म्हणाले.
- अल्लाउद्दीन खिलजी येणार ही महाराष्ट्रातली पहिली फेक न्यूज, असे राज ठाकरे म्हणाले.
20:11 May 01
- मी कुठेही सभा घेतली, तरी लोक ऐकतीलच; संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार
- राज ठाकरे यांची घोषणा
19:52 May 01
- राज ठाकरे सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात आगमन
19:44 May 01
- औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवातीला 101 पुरोहित शंखनाद करून मंत्रोपचार करणार आहेत. धर्माची बाजू घेतल्याने आम्ही राज ठाकरे यांच्या सभेला आलो असून भोंग्यांच्या मुद्द्यावरून नाही तर धर्माच्या मुद्द्यावरून आम्ही राज ठाकरे यांच्या बाजूने राहू, असे मत पुरोहित संघटनेचे अनंत पांडव गुरुजी यांनी व्यक्त केले.
19:16 May 01
राज ठाकरे यांच्या सभेला 101 पुरोहितांचे मंत्रोपचार
औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या सुरुवातीला 101 पुरोहित शंखनाद करून मंत्रोपचार करणार आहेत. धर्माची बाजू घेतल्याने आम्ही राज ठाकरे यांच्या सभेला आलो असून भोंग्यांच्या मुद्द्यावरून नाही तर धर्माच्या मुद्द्यावरून आम्ही राज ठाकरे यांच्या बाजूने राहू, असे मत पुरोहित संघटनेचे अनंत पांडव गुरुजी यांनी व्यक्त केले.
18:50 May 01
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. सभेच्या ठिकाणी नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
17:45 May 01
राज ठाकरेंच्या सभेला सुप्रिया सुळेंच्या शुभेच्छा
मुंबई -राज ठाकरे यांची आज औरंगाबाद मध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना औरंगाबादच्या सभेसाठी मनपूर्वक शुभेच्छा ही सुप्रिया सुळे यांनी दिली आहेत. तसेच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे मुद्द्यावरून 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण अल्टिमेटम असा शब्द कधी मानतच नाही.
17:43 May 01
- औरंगाबाद -राज ठाकरे यांच्या सभेच्या आधी शांतता मार्च रॅली काढण्यास वंचित बहुजन आघाडील पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याच बरोबर वंचितचे अमित भुईगळ यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर देखील ही रॅली निघेल, असा इशारा वंचित तर्फे देण्यात आला आहे.
16:49 May 01
- भीम आर्मीचे अशोक कांबळे यांना मुंबईहून औरंगाबादकडे निघणार असताना, घाटकोपर येथे अटक करण्यात आली आहे.
15:32 May 01
पोलीस यंत्रणा सज्ज
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला जवळपास एक लाख लोक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज असून एक पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त यांच्यासह तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. तर सभा मैदानात आणि शहरातील इतर भागांमध्ये जवळपास 750 सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत. सभा सुरू असताना किंवा सभा झाल्यावर होणाऱ्या हालचाली वर बारीक लक्ष असणार आहेत. नागरिकांना चुकीचं काही आढळून आल्यास नागरिकांनी 112 हेल्पलाईन वर माहिती द्या, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केले आहे.
15:31 May 01
राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान सज्ज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान सज्ज झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून मैदानात तयारी सुरू होती. विशेषतः पोलीस परवानगी मिळाल्यावर मनसेचे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली. मागील आठ दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्ते निमंत्रण देत होते. चार दिवसांपासून मनसेचे बडे नेते शहरात दाखल झाले होते. त्यांच्या माध्यमातून शहरात सभेची वातावरण निर्मिती आणि सभेची तयारी करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातून अनेक कार्यकर्ते शहरात दाखल होत आहेत. तर आयोध्यातून देखील कार्यकर्ते दाखल होणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. तर रविवारी सायंकाळी इतिहास घडेल, असा विश्वास सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
14:46 May 01
Raj Thackeray Sabha LIVE UPDATE
औरंगाबाद - राज ठाकरे यांच्या बहुचर्चित सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानात मनसे सैनिकांसह पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जवळपास एक लाख लोक सभेसाठी येणार असल्याने तीन हजार पोलीस सज्ज राहिले आहेत.