मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बजावलेल्या नोटीसीमुळे मनसे पक्ष कार्यालय राजगड येथे उद्या सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच विभागअध्यक्षांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
'ईडी' चौकशीच्या पार्श्वभूमीवर, मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक - Raj Thackeray ED matter
पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहिनूर मिल जमीन व्यवहार प्रकरणात, 22 तारखेला राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जाण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray ED matter
'ईडी' चौकशीच्या पार्श्वभूमीवर, मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक
पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहिनूर मिल जमीन व्यवहार प्रकरणात, 22 तारखेला राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी, हे सरकार सूडबुद्धीने वागत आहे असे म्हणत, सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला होता.