मुंबई -लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, बैठका, विनवण्या, हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण, “लाथो के भूत बातों से नही मानते”, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
वीज बिल मुद्यावरून मनसे आंदोलन छेडणार आहे. आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले. राजगडावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील. तसे पुढचे आंदोलन असणार आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपाडे यांनी स्पष्ट केले.
मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया-
दरम्यान, वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रीया दिली. परब म्हणाले, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. वीजबिल सवलतीमध्ये अभ्यास करून निर्णय घेतल्यास त्याचा किती जणांना याचा फायदा होतो. याचा अभ्यास करत होतो. येत्या काही दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अशी प्रतिक्रिया परब यांनी व्यक्त केली. विरोधकांचे काम आहे विरोध करायचे. आता त्यांना काही दुसरे काम नाही, असा टोला देखील परब यांनी लगावला.
वीज बिलात कोणतीही सवलत नाही - नितीन राऊत