मुंबई -एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज मनसेतर्फे देखील वाशी ते विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता. पायी निघालेल्या या मोर्चामध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवत आंदोलकांना ताब्यात घेतले.
मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ते वाशी असा मोर्चा काढला. सकाळी ७ वाजता वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. परंतु वाशी पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडवला. स्वप्निलला न्याय मिळालाच पाहिजे, सरकारवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सैनिकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाशी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन थांबवले.
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक.. वाशी ते विधान भवन मोर्चा, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात - स्वप्नील लोणकर आत्महत्या
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज मनसेतर्फे देखील वाशी ते विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिले होते. ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावे लागलं याची व्यथा मांडत स्वप्नीलने गळ्याला फास लावून घेतला. अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरू होतं याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत.