महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS attack IPL Bus Mumbai : वाहतुकीचे काम स्थानिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली - मनसे कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली

आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. (MNS activists smashed IPL Bus) वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर उभ्या होत्या. त्या बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.

मनसेने कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली
मनसेने कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली

By

Published : Mar 16, 2022, 8:51 AM IST

Updated : Mar 16, 2022, 12:13 PM IST

मुंबई -आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर उभ्या होत्या. त्या बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.

आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून काही झाले नाही

महाराष्ट्रात होणारे आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. (MNS activists On IPL) आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून काहीही होत नव्हते. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.

व्हिडिओ

नेमकं कारण काय?

आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ही तोडफोड करण्यात आली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या आहेत. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिले जात नसल्यानेच मनेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज

स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम दिले जावे अशी मनसेची मागणी आहे. आयपीएलच्या हंगामाला 26 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा -सोनिया गांधी कडाडल्या, मागितला उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरच्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

Last Updated : Mar 16, 2022, 12:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details