मुंबई-पायाभूत सुविधाची उभारणी करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सर्व कारभार ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही संकल्पना एमएमआरडीएने स्वीकारली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ई-ऑफिसचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एमएमआरडीएचा सर्व कारभार ऑनलाइन; ई-ऑफिसचा वापर कर्मचाऱ्यांना अनिवार्य - Mumbai Metropolitan Region Development Authority news
एमएमआरडीएच्या कारभाराची व्याप्ती फार मोठी आहे. अशावेळी कोरोनासारख्या कठीण काळात कामात कसे आणि किती अडचणी येतात याचा अनुभव एमएमआरडीएमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला आहे. त्यानुसार ई-ऑफिस ही संकल्पना एमएमआरडीएने पुढे आणली आहे.
![एमएमआरडीएचा सर्व कारभार ऑनलाइन; ई-ऑफिसचा वापर कर्मचाऱ्यांना अनिवार्य एमएमआरडीए](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9561924-17-9561924-1605533172158.jpg)
एमएमआरडीएच्या कारभाराची व्याप्ती फार मोठी आहे. अशावेळी कोरोनासारख्या कठीण काळात कामात कसे आणि किती अडचणी येतात याचा अनुभव एमएमआरडीएमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला आहे. त्यानुसार ई-ऑफिस ही संकल्पना एमएमआरडीएने पुढे आणली आहे. या संकल्पनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कामाला येणार वेग-
कोरोनामुळे मार्चमध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आली. अनेक ठिकाणी काम बंद झाले. तर काही ठिकाणी वर्क फार्म होम पद्धतीने काम सुरू राहिले. अशावेळी एमएमआरडीएच्या कामावरही मोठा परिणाम झाला. मेट्रो, रस्ते, उड्डाणपुलासारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असताना या प्रकल्पाचे कामही काही काळ मंदावले. त्यात आधी 15 टक्के आणि नंतर 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करावे लागल्याने ही काम रखडले. भविष्यातही अशी कठीण काळ आल्यास प्रकल्प आणि काम रखडू नये यासाठी एमएमआरडीएने ई ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या ई ऑफिसमुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांना कुठेही कधीही मोबाईलवरही काम करता येणार आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढणार आहे. पर्यायाने प्रकल्पही वेग घेतील, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.
प्रकल्प मंजुरी ते सर्व मीटिंग होणार ऑनलाइन-
प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करून घेत ते मंजूर करून घेणे व त्यांना मंजुरी देणे हे सर्व कामकाज ऑनलाइन होणार आहे. तर विविध मीटिंग आणि सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. तर ई-ऑफिसच्या सुरक्षिततेवरही सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांनी विशेष लक्ष दिल्याची माहिती आर. ए. राजीव , महानगर आयुक्त यांनी दिली आहे. ई ऑफिसमुळे कामात पारदर्शकताही येणार आहे. एमएमआरडीए तंत्रज्ञानाचा हात धरून अत्याधुनिक होत आहे. त्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळात मुंबईला होईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.