महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीकेसी ते निसर्ग उद्यान झुलत्या पूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने मागवली निविदा - झुलत्या पादचारी पूला बद्दल बातमी

निसर्ग उद्यानाकडे आणखी मोठ्या संख्येने पर्यटक, निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी आकर्षित व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसी ते निसर्ग उद्यान असा झुलता पादचारी पूल बांधण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. या कामाची निविदा मार्गीएमएमआरडीएने मागवली आहे.

MMRDA invites tender for BKC to Nature Park suspension Suspension bridge work
अखेर बीकेसी ते निसर्ग उद्यान झुलता पादचारी पूल मार्गीएमएमआरडीएने पुलाच्या कामासाठी मागवली निविदा

By

Published : Mar 2, 2021, 6:46 PM IST

Updated : Mar 2, 2021, 7:40 PM IST

मुंबई -शहराती लहानमुले आमि वृध्दांचे एक आवडीचे पर्यटन स्थळ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासाचे एक केंद्र म्हणजे धारावी निसर्ग उद्यान. या उद्यानाला एका वर्षात 4000 नागरिक भेट देतात. अशावेळी या उद्यानाकडे आणखी मोठ्या संख्येने पर्यटक, निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी आकर्षित व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसी ते निसर्ग उद्यान असा झुलता पादचारी पूल बांधण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. मात्र, हा पूल काही मार्गी लागत नव्हता. आता मात्र या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. एकीकडे एमएमआरडीएने या पुलासाठी अर्थसंकल्पात 77 कोटींची तरतूद केली आहे, तर दुसरीकडे नुकतीच पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवली आहे. तेव्हा येत्या काही वर्षांतच मुंबईकरांना बीकेसीतुन मिठी नदीवरून झुलत्या पादचारी पुलावरून चालण्याचा आणि निसर्ग उद्यान पाहण्याचा आंनद मिळणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी झुलता पूल -

धारावी निसर्ग उद्यान हे मुंबईला लाभलेले मोठे लेणे आहे. 37 एकरवरील या उद्यानात 130च्या जातीचे पक्षी, 80 प्रकार चे फुलपाखरे आणि 12 प्रकारचे स्पायडर आढळतात. येथे अनेक प्रकारची झाडे, औषधी आणि दुर्मीळ वनस्पती आहेत. त्यामुळे या उद्यानाला विशेष महत्व असून दरवर्षी याला 4000 नागरिक भेट देतात. तेव्हा या उद्यानाला आणखी मोठ्या संख्येने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी एमएमआरडीएने बीकेसी ते निसर्ग उद्यान असा पादचारी झुलता पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये या पुलाची घोषणा झाली होती. आता 2021 मध्ये याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते आणि मुंबईकरांना यावरून कधी प्रवास करता येईल हा आता प्रश्न आहे.

जगातील सर्वात मोठा आणि आकर्षक झुलता पूल! एमएमआरडीएचा दावा -

बीकेसीतील सिटी पार्क येथून हा पूल सुरू होणार असून तो मिठीनदीवरून पुढे निसर्ग उद्यानाला जाणार आहे. साधारणतः 695 मीटर लांबीचा हा झुलता पादचारी पूल असून तो लाकडाचा आणि काचेचा असणार आहे. दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा पूल असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पूल जगातील सर्वात मोठा झुलता पादचारी पूल असेल असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. दरम्यान या पुलासाठी 98 कोटी 87 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

Last Updated : Mar 2, 2021, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details