महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे आमदार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार - दीपक केसरकर - Deepak Kesarkar on mahavikad aghadi government

शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील, असे दीपक केसरकारांनी स्पष्ट केलं ( MLAs Shinde camp ready floor test Say Deepak Kesarkar ) आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

By

Published : Jun 26, 2022, 9:25 PM IST

Updated : Jun 26, 2022, 9:30 PM IST

मुंबई - बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपलं मतं मांडलं आहे. आणखी एक दोन आमदार आमच्या गटात सहभागी होती. त्यांच्या पाठिंब्याने आमचे संख्याबळ 51 पर्यंत जाईल. आम्ही 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन महाराष्ट्रात येऊ, असे केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. मात्र, प्रथम एकनाथ शिंदे गटाला मान्यात द्यावी. आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असेही केसरकरांनी म्हटलं ( MLAs Shinde camp ready floor test Say Deepak Kesarkar ) आहे.

बंडखोर गट सर्वोच्च न्यायालयात - महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी ( 27 जून ) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

"आमचा महाविकास आघाडीला पाठींबा" - विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधरता येईल, याचा निर्णय आम्हाला तेथेच घ्यायचा आहे. आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांची वक्तव्य समोर आली आहेत. त्यातून स्पष्ट होते आहे की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेला खात्री आहे त्यांची लोक परत येतील आणि त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा महाविकास आघाडीला पाठींबा आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Kamat On Rebel MLAs Suspension : शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणारच, सेनेचे वकील कामतांचा दावा

Last Updated : Jun 26, 2022, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details