मुंबई - राज्यसभेची ( Rajya Sabha Election 2022 ) तब्बल 24 वर्षांनी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची मंगळवारी (दि. 7 जून) हॉटेल ट्रायडंट येथे बैठक बोलावली होती. लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithviraj Chavan ) यांनी दिली. दरम्यान, चारही जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल, असा ठाम विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार उपस्थित होते.
Rajya Sabha Election 2022 : लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल - पृथ्वीराज चव्हाण - हॉटेल ट्रायडंट
राज्यसभेची ( Rajya Sabha Election 2022 ) तब्बल 24 वर्षांनी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची मंगळवारी (दि. 7 जून) हॉटेल ट्रायडंट येथे बैठक बोलावली होती. लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithviraj Chavan ) यांनी दिली. दरम्यान, चारही जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल, असा ठाम विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार उपस्थित होते.
राज्यात राज्यसभेची निवडणूक होऊ घातली आहे. दोन दिवसात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपने सहाव्या जागेसाठी तिसरा उमेदवार दिल्याने गेल्या 24 वर्षांत प्रथमच निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ राखणे, महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना आणि भाजप महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महा विकास आघाडीच्या आमदारांची मंगळवारी (दि. 7 जून) ट्रायडेंट हॉटेल येथे बैठक बोलावण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे ( Congress Leader Mallikarjun Kharge ) आणि एच के पाटील ( H K Patil ) हे या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
गेल्या 24 वर्षांत राज्य सभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बहुतांश आमदारांना या निवडणुकीची प्रक्रिया माहीत नाही. ही प्रक्रिया समजून सांगण्यासाठी मंगळवारी (दि. 7 जून) बैठक बोलावली होती. उत्साहाच्या वातावरणात ही बैठक झाली. मोठ्या संख्येने आघाडी सरकारला पाठिंबा दिलेले आमदार उपस्थित होते. काहींनी परवानगी घेतली होती. काही उशिरा येणार असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. कोणीही सोडून बाहेर जाणार नाही. लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ही बैठक चांगल्या पद्धतीने झाली. महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व जागा निवडून येतील, तेवढे मताधिक्य आघाडीकडे आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार यामुळे नक्की जिंकून येतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि एचके पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच सुरुवातीपासून आघाडी सोबत असलेल्या सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. ते सर्वच शेवटपर्यंत सोबत राहतील, त्यामुळे राज्यसभेची निवडणूक जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे पदवीधर आमदार अभिजित वंजारी ( MLA Abhijit Wanjarri ) यांनी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला ईडीचा विरोध