महाराष्ट्र

maharashtra

Electricity Outstanding Maharashtra : राज्यात आमदार, मंत्री, खासदारांनी थकवली लाखोंची वीजबिले

By

Published : May 7, 2022, 10:37 AM IST

एकीकडे महावितरणकडून राज्यातील ग्राहकांच्या वीजबिल ( Exhausted electricity bills ) वसुलीसाठी कारवाई करण्यात येत असताना महावितरणने आमदार, मंत्री आणि खासदारांना खुलेआम सूट दिली असल्याचे दिसत आहे. राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांकडे लाखोंची वीजबिले थकली ( MLA MP Ministers Electricity Outstanding Bills ) असून, याची वसुली कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Mahavitaran
महावितरण

मुंबई -सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात वीज टंचाई ( Electricity Shortage Maharashtra ) सुरू असताना उष्णतेची लाट सुद्धा सुरू आहे. त्यात कोळशाचा तुटवडा आणि जवळजवळ हजारो कोट्यवधीची थकीत वीज बिले ( Exhausted electricity bills ) यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे वीजबिल न भरणाऱ्या लोकांमध्ये राज्यातील विविध व्हीव्हीआयपी आणि राजकारण्यांचाही समावेश ( MLA MP Ministers Electricity Outstanding Bills ) आहे. काही जणांची वीज बिले ही लाखो रुपयांची आहे तर काहींची वीजबिले ही किरकोळ रकमेची आहेत. यातही काही वीजबिले ही वर्षानुवर्ष थकीत आहेत. अशा एकूण ३७२ जणांकडे १ कोटी २७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. ऊर्जा विभागाने ही थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे.


विजबिल थकवणारे व्हीव्हीआयपी ? :३० एप्रिल २०२२ पर्यंत वीजबिल न भरणाऱ्या लोकांमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्री, त्यांचे कुटुंबीय, खासदार, विविध राजकीय पक्षांचे आमदार आणि त्यांच्याशी संबंधित काही संघटनांचा समावेश आहे. ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी वीज बिल चुकवणाऱ्या व्हीव्हीआयपी बद्दल भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले की त्यांनी राज्यातील सर्व लोकांना नम्रपणे विनंती केली आहे की, वीज कंपन्यांना मदत करण्यासाठी जनतेने त्यांची थकबाकी लवकरात लवकर भरावी. या संदर्भामध्ये थकीत वीज बिल धारकांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील घराची आणि शेताची २५००० आणि १०,००० रुपये बिल यांचा समावेश आहे. ही बिले २००९, २०१३ ची आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे २,००० रुपयांचे बिल असून, हे १९८७ पासून भरले नाही आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील २००९ पासून अवघे ३४० रुपये भरले नाहीत. तसेच त्यांच्या पत्नी मनिषा टोपे यांचे व्यावसायिक जागेचे १९,००० रुपये थकीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २ लाख ६३ हजार रुपये, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे महसूल मंत्री अशोक चव्हाण यांचे १९९१ पासूनचे १९०० आणि २००५ चे दुसरे न भरलेले बिल २५०० रुपये आहे. काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे १८,००० रुपये २०१२ आणि २४,००० रुपये २०१६ अशी दोन शेतीची बिले प्रलंबित आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते हरिभाऊ बागडे यांचे १९८० पासून चे ३१,००० रुपयांचे बिल प्रलंबित आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे २०११ पासूनचे ११,००० रुपयांचे कृषी बिल भरायचे आहे. राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १९९७ पासूनचे १,११,०००रुपये आणि १,२२,००० रुपये अशी दोन शेतजमिनीची बिले भरलेली नाहीत. महत्त्वाचे म्हणजे यातील सुमारे १० बिले १९६० पासून थकीत आहेत. त्यात सर्वात जुने बिल हे १९६१ चे असून ते पांडुरंग एन पाटील यांच्या नावावर आहे.


वीजबिल थकबाकी ऊर्जा विभागासाठी आता डोईजड :वीज बिल भरले नाही तर महावितरण सर्वसामान्यांचा वीज पुरवठा खंडित करते. मात्र या मंत्री, आमदार, खासदार यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. काहींची वीजबिल थकीत थकबाकी ही अगदी नगण्य आहे. तर काहींची लाखांमध्ये आहे. तरीसुद्धा आत्ता ऊर्जा विभागाने ही यादी जाहीर केली असल्याने हे स्पष्ट झालं की, आता ही थकबाकी ऊर्जा विभागासाठी डोईजड झालेली आहे. एकीकडे राज्यात विजेचा तुटवडा आणि दुसरीकडे ही थकबाकी आता ऊर्जा विभागाला परवडणारी नाही आहे हे यातून दिसून येतं.

हेही वाचा : Maharashtra Electricity Issue : महागड्या वीज खरेदीचा ग्राहकांना बसणार भुर्दंड?

ABOUT THE AUTHOR

...view details