मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी एक तासही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी वेळ दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर फक्त सरकार राजकारण करत आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला.
मराठा आरक्षणाप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही राज्य सरकारच्या मनात पाप - विनायक मेटे - अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी एक तासही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी वेळ दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर फक्त सरकार राजकारण करत आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कार्यालयास विनायक मेटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हा मुद्धा मांडला. ते म्हणाले, 2005 ला स्मारकाला मान्यता मिळाली. फडणवीस सरकारने स्मारकाला गती देण्याचे काम केले. ठाकरे सरकारने स्मारकाचे काम कुठे अडकले आहे, यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यातच सामान्य प्रशासनाकडे स्मारकाचे काम आहे आणि हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असूनही दुर्लक्ष होत आसल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.