मुंबई -एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी ( MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group ) करून आपला वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिवसेनेत आमदारांची गळतीच सुरू झाली. आता शिंदे गटाने भाजपबरोबर राज्यात सरकार स्थापन केली आहे. आज विधानभवनात विश्वास दर्शक ठराव असून यात शिंदे भाजप गटाला बहुमत सिद्ध करायचे आहे.अशातच आता शिवसेनेतून एक आमदार बाहेर निघाल्याचे समजले आहे.
आमदार संतोष बांगर शिंदे गटात; शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत म्हणत झाले होते अश्रू अनावर - MLA Santosh Bangar news
शिवसेनेतून एक आमदार बाहेर निघाल्याचे समजले आहे. आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group ) हे शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज ते शिंदे ( MLA Santosh Bangar news ) गटात आल्याने या गटाला बळ मिळणार आहे. हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका मानला जात आहे.
![आमदार संतोष बांगर शिंदे गटात; शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत म्हणत झाले होते अश्रू अनावर MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15730746-thumbnail-3x2-op.jpg)
आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात ( MLA Santosh Bangar news ) सामील झाले आहेत. काल त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज ते शिंदे गटात आल्याने या गटाला बळ मिळणार आहे. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका मानला जात आहे.
16 आमदार असलेल्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावासाठी गोगावले यांनी जारी केलेला व्हीप त्यांना बंधनकारक असणार आहे. या 16 आमदारांनी व्हिप पाळण्यास नकार दिल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. या १६ आमदारांवर कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. विशेष म्हणजे, आज होणाऱ्या बहुमत चाचणी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १६ आमदार काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -COVID19: भारतात गेल्या 24 तासात 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू