मुंबई- शिवसेना आमदार रविंद्र वायकर ( MLA Ravindra Waikar on ED ) यांची ईडीने ( Enforcement Directorate ) तब्बल आठ तास चौकशी केली. आमदार वायकर ( MLA Ravindra Waikar ) यांनी आज विधानभवनात हजेरी लावताच, प्रसारमाध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, ईडीने चौकशीला बोलवले होते मी गेलो आणि त्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना उत्तरे दिल्याचे आमदार वायकर यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी रवींद्र वायकर विधानभवनात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडी चौकशीवरही त्यांनी देताना ते म्हणाले, आरोप वगैरे काही नाहीत. ईडीला काही प्रश्न विचारायचे होते. चौकशीचा त्यांना संपूर्ण अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावले होते. बोलवल्यानंतर जाणे आणि स्पष्टीकरण देणे महत्वाचे होते. त्यानुसार त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली असून देशाचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य केल्याचे वायकर म्हणाले.