Ravi Rana On Umesh Kolhe Case : उमेश कोल्हे यांच्या हत्येचे मास्टरमाईंड अजून बेपत्ता - रवी राणा
मुंबई - अमरावती येथील औषधी विक्रेता उमेश कोल्हे हत्याकांडाच्या ( Umesh Kolhe Murder Case ) सूत्रधाराला पोलिसांनी जरी अटक केली असली तरी सुद्धा याच्या मागचे मुख्य सूत्रधार अजून अटकेच्या प्रतीक्षेत आहेत असे, अमरावतीचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी सांगितले आहे. उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा ( Former BJP spokesperson Nupur Sharma ) यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे ही हत्या झाल्याची तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना अमरावतीचे आमदार रवी राणा म्हणाले की, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु एनआयएकडून या प्रकरणाची चौकशी होत असल्याने आता सत्य समोर येत आहे. पोलीस आयुक्तांनी दबावामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.