महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 4, 2022, 11:35 AM IST

Updated : May 4, 2022, 12:42 PM IST

ETV Bharat / city

Rana Couple Grant Bail : 12 दिवसांच्या तुरुंगवासानंतर राणा दाम्पत्याला दिलासा; मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

मुंबई सत्र न्यायालयाचा राणा दाम्पत्याला ( Rana Couple Grant Bail ) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर ( Rana Couple Grant Bail by mumbai sessions court ) केला आहे.

Rana Couple Grant Bail
नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला ( Rana Couple Grant Bail ) दिलासा दिला आहे. न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांना जामीन मंजूर ( Rana Couple Grant Bail by mumbai sessions court ) केला आहे. 23 एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने म्हटले आहे, की पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करणार नाही आणि या विषयावर माध्यमांशी न बोलण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला जात आहे. दरम्यान अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी जिंदाबादच्या घोषणा देत जल्लोष केला आहे.

'या' अटीवर राणा दाम्पत्यांना जामीन - राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अटी शर्तींसह या पती-पत्नींना जामीन मजूंर झाला असून 12 व्या दिवशी त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना काही अटी व शर्ती वर जामीन दिला आहे. त्यात प्रमुख्याने प्रसारमाध्यमांशी राणा दाम्पत्यांना संवाद साधता येणार नाही. प्रत्येकाला 50 हजारांची रोख जामीन आणि तेवढंच किंमतीच्या एक जामीनदार द्यावा लागणार आहे.

नवनीत राणा आणि रवी राणांचे हनुमान चालिसा ते कोठडी आणि जामीनापर्यंतचा प्रवास

काय होतं प्रकरण -खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. येथून या प्रकरणाला सुरुवात झाली होती. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आणि त्यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. शिवसैनिकांचा वाढता विरोध आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौऱा या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आंदोलन स्थगित केले. मात्र 23 एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली.

राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत - हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईत जोरदार खडाजंगी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा लक्षात घेत राणा दाम्पत्याने माघार घेतली होती. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती.

नवनीत राणा यांचे ओम बिर्लांना पत्र - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले होते. या पत्रात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले होते. पण, ते दिले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिले नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,' असा दावा नवनीत राणा यांनी पत्रात केला होता.

लोकसभा सचिवालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवल्यानंतर केंद्र अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लोकसभेने राज्यातील महाआघाडी सरकारला २४ तासात या प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राणा यांनी याबाबतचा ईमेल ओम बिर्ला यांना पाठवला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांचा वेळ दिला आहे. याचबरोबर लोकसभेच्या हक्कभंग समितीने नवनीत राणा यांना बेकायदा अटक केल्याप्रकरणी २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ जारी - नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केले होते. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचे या व्हिड़िओत दिसत होते.

व्हिडिओचा अन् नवनीत राणांच्या तक्रारीचा संबंध नाही - पोलीस आयुक्त संजय पांडेंनी जारी केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ हा खार पोलीस ठाण्यातील आहे. त्यानंतर राणांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. त्यामुळे या व्हिडिओचा आणि नवनीत राणांनी केलेल्या तक्रारीचा काहीही संबंध नसल्याचा दावा नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चेंट यांनी केला आहे.

राणा दाम्पत्यांचा जामीन मंजूर -मुंबई सत्र न्यायालयाचा राणा दाम्पत्याला आज बुधवारी झालेल्या सुनावनीत दिलासा दिला आहे. न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर केला आहे. या जामीनासाठी त्यांना काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -खासदार नवनीत राणा जेजे रूग्णालयात दाखल; तुरूंगात कंबरेचा त्रास

हेही वाचा -Video : नवनीत राणा पोलिसांवर भडकल्या.. म्हणाल्या, 'आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही आम्हाला असं घेऊन जाऊ शकत नाही'..

हेही वाचा - Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...

हेही वाचा - Navneet Rana-Ravi Rana arrested Video : राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक; पाहा व्हिडिओ

Last Updated : May 4, 2022, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details