महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालेल्या राम कदमांच्या घरी पोलीस; कदम यांचा आरोप - सिद्धिविनायक मंदिर

राज्य सरकारकडून निर्बंधमुक्त करत असताना बार खुली करण्याला परवानगी दिली जाते. त्यासाठी नियम आणि अटी घालून दिल्या जात आहे. मात्र नियम व अटीनुसार मंदिरही खुली करण्यास राज्य सरकार परवानगी का देत नाही, असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.

आमदार राम कदम
आमदार राम कदम

By

Published : Aug 17, 2021, 2:29 PM IST

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र निर्बंध शिथिल करत असताना राज्यातील मंदिरं का खुली केली जात नाही, असा सवाल विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. राज्यातील मंदिर खुली करावीत यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम हे आज सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेणार होते आणि मंदिर खुली करण्यासंदर्भात राज्य सरकारला चेतावनी देणार होते. मात्र आपण मंदिरापर्यंत पोहोचू नये यासाठी राज्य सरकारने पोलीस आपल्या घरी पाठवत असल्याचा आरोप राम कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच सिद्धिविनायक मंदिरात जाण्यापासून आपल्याला रोखले जात आहे. आपण मंदिरापर्यंत पोहोचू नये यासाठी पोलीस आपल्याला अटक करत असल्याचा आरोपही राम कदम यांनी केला आहे.

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालेल्या राम कदमांच्या घरी पोलीस

मद्यालय खुली मंदिरं का नाही?

राज्य सरकारकडून निर्बंधमुक्त करत असताना बार खुली करण्याला परवानगी दिली जाते. त्यासाठी नियम आणि अटी घालून दिल्या जात आहे. मात्र नियम व अटीनुसार मंदिरही खुली करण्यास राज्य सरकार परवानगी का देत नाही, असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details