महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajya Sabha Elections : कुठे गेली धर्मनिरपेक्षतता..?, महाविकास आघाडीने स्पष्टीकरण करावे - आमदार शेख

राज्यसभेच्या निवडणुकीला दोन दिवसाचा अवधी राहिला असतानाच समाजवादी पक्षाने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकार स्थापनेपूर्वी किमान समान कार्यक्रम धोरण आखले होते त्याचे काय झाले, असा सवाल सपाचे आमदार रईस शेख ( MLA Rais Shaikh ) यांनी केला असून महाविकास आघाडीने स्पष्टीकरण करावे,  अशी मागणी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

MLA Rais Shaikh
आमदार रईस शेख

By

Published : Jun 7, 2022, 5:37 PM IST

मुंबई- राज्यसभेच्या निवडणुकीला दोन दिवसाचा अवधी राहिला असतानाच समाजवादी पक्षाने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकार स्थापनेपूर्वी किमान समान कार्यक्रम धोरण आखले होते त्याचे काय झाले, असा सवाल सपाचे आमदार रईस शेख ( MLA Rais Shaikh ) यांनी केला असून महाविकास आघाडीने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस लागली आहे. शिवसेनेने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची महत्वाची ठरणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मनधरणीसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीतील छोटे व अपक्ष आमदारांची नाराजी यानिमित्ताने उफाळून येत आहे. अनेकांनी उघडपणे भूमिका स्पष्ट केल्याने आघाडीपेच निर्माण झाला आहे. आमदारांच्या मनधरणीसाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु, छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांकडून आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येत आहेत.

समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी (दि. 7 जून) शिवसेनेचे नेते तथा मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. दरम्यान, गेल्या अडीच वर्षात अल्पसंख्यांकांसाठीच्या कोणत्याच मागण्या पूर्ण झाले नसल्याची खंत त्यांनी परब यांच्यासमोर व्यक्त केली. तसेच किमान समान कार्यक्रम धोरणावर स्थापन सरकारने धर्मनिरपेक्षतता विसरले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चढाओढ सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला याची आठवण करून देण्यासाठी विविध मागण्यांचे पत्र अनिल परब यांच्याकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केल्याचे शेख म्हणाले.

महाविकास आघाडी सोबतच पण.. -राज्यसभेचा निवडणुकीत मताधिक्य फुटण्याचा धोका वर्तवला जातो आहे. दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना सोमवारी (दि. 6 जून) संध्याकाळी रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आज दुपारी त्या सर्वांना ट्रायडेंटला नेण्यात आले आहे. तुम्हीही आमदारांसोबत हॉटेल्समध्ये जाणार का, असा सवाल उपस्थित केला असता, आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. पण, मतदान कोणाला करायचे हा निर्णय राज्याचे अध्यक्ष अबू आझमी हे ठरवणार असल्याचे शेख म्हणाले.

हेही वाचा -Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना भांबावलेल्या अवस्थेत - प्रवीण दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details