महाराष्ट्र

maharashtra

Prasad Lad In Legislative Council : कॉलेजमध्ये असताना प्रेमप्रकरण करून आमदाराच्या मुलीला पळवून लग्न केले - प्रसाद लाड

By

Published : Mar 24, 2022, 3:23 PM IST

विधानपरिषदेतील निवृत्त होत असलेल्या सदस्यांना ( Retiring Members Of Legislative Council ) काल निरोप देण्यात आला. भाजपचे नेते प्रसाद लाड हेही निवृत्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी विधानपरिषदेत आठवणी ( Prasad Lad In Legislative Council ) जागवल्या. कॉलेजमध्ये असताना प्रेमप्रकरण करून आमदाराच्याच मुलीला पळवून लग्न ( Prasad Lad Love Story ) केले. बायकोच्या वडिलांचा रुबाब पाहूनच मी ठरवले की एक दिवस आमदार व्हायचे, असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

प्रसाद लाड
प्रसाद लाड

मुंबई -विधान परिषदेतील १० सदस्य जून व जुलै २०२२ रोजी निवृत्त होत ( Retiring Members Of Legislative Council ) आहेत. त्यामुळे सभागृहात काल त्यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यामध्ये भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. त्यांनी निवृत्त होताना आपल्या भावना व्यक्त करताना जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा ( Prasad Lad In Legislative Council ) केला. विशेष करून वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले, तेव्हा आमदाराची मुलगी पळवली होती असे त्यांनी ( Prasad Lad Love Story ) सांगितले.

ठरवले होते की एक ना एक दिवस आमदार व्हायचे : निरोपाच्या शुभेच्छा देताना अनेक सदस्यांनी प्रसाद लाड यांचा उद्योजक असा उल्लेख केला. त्यावर लाड म्हणाले, मी टाईम्स ऑफ इंडियात आधी हमाली केली आहे. मी १९ व्या वर्षीच लग्न केले. त्यावेळच्या विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केले होते. त्याचवेळी ठरवले होते की एक ना एक दिवस आमदार व्हायचे, असे लाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ते म्हणाले संघर्षातून मी विश्व निर्माण केले. मी एका गरीब कुटुंबातील असून परळच्या छोट्या खोलीत मी राहिलो आहे. कॉलेजला असताना प्रेमप्रकरणाची सुरूवात झाली. माझ्या बायकोचे वडिल बाबुराव बापसे विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांचा जो रूबाब होता, तो पाहूनच मी ठरवले की की एक ना एक दिवस आमदार व्हायचे. विधानपरिषद सदस्य बापसे यांची मुलगी पळवून जाऊन लग्न करणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती.

२१ व्या वर्षी मुलगी झाली : तेव्हा खिशात पैसे नव्हते. मी हमालीकी करायचो, तेव्हा मला ७० रुपये मिळायचे. त्यातले ४० रुपये बायकोला द्यायचो आणि बाकी उरलेल्या पैशात माझे समाजकारण, राजकारण चालायचे. २००० मध्ये उद्योग सुरू केला. आयुष्यात सगळ्या गोष्टी लवकर मिळाल्या. २१ व्या वर्षी मला मुलगी झाली.

राष्ट्रवादीचा प्रवास महत्त्वाचा : या प्रसंगी बोलताना लाड म्हणाले की, जयंत पाटील यांच्यामुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी ३१ व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा खूप कठीण होते. सगळ्यात लहान विश्वस्त मी होतो. संघर्षातून यशाची पायरी गाठली, अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मला म्हाडाचा सभापती म्हणून संधी दिली होती. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी दिली, असेही लाड यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details