मुंबई - मुंबई सायबर सेलने माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना पाठवलेल्या नोटीस वरून आता राजकारण तापू लागलेल आहे. या प्रकरणांमध्ये अगोदर मुंबई सायबर सेल ने बीकेसी येथे देवेंद्र फडवणीस यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु नंतर आज त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर येथेच त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी अधिकारी येणार आहेत. परंतु या सर्व प्रश्नावर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रश्नी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आवाज उठवला जाईल असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितल आहे. देवेंद्र फडणीस यांच्या सागर या निवासस्थानी ते बोलत होते.
Devendra Fadnavis Enquiry : फडणवीसांच्या चौकशीचे पडसाद विधिमंडळातही उमटणार - आमदार प्रसाद लाड - mumbai police
अगोदर मुंबई सायबर सेल ने बीकेसी येथे देवेंद्र फडवणीस यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु नंतर आज त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर येथेच त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी अधिकारी येणार आहेत. परंतु या सर्व प्रश्नावर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रश्नी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आवाज उठवला जाईल असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितल आहे.
चौकशी कोणाची करायची?
या विषयावर बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला त्यांची चौकशी करायची की याच्यामध्ये दोषी आहेत त्यांची चौकशी करायची? असा आरोप त्यांनी केला आहे.
ज्या पद्धतीची कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरू आहे ती पाहता या सरकारला दुसरं काही काम उरले नाही, अशी टीका भाजप नेते प्रसाद यांनी केली आहे. विशेष करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना अशा पद्धतीने विरोधी पक्षांना नोटीस पाठवणे हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितलेल आहे. एकंदरीत या प्रश्नावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ते आवाज उठवणार असून या प्रकरणी सरकारला जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.