मुंबई -भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली ( Prasad Lad In High Court ) आहे. कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणात कारवाईच्या भीतीने त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत पोलीस कारवाई पासून संरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
प्रसाद लाड यांनी म्हटलं की, एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणावरुन पाच वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. ते प्रकरण आता संपले सुद्धा. मात्र, तरीही आता पुन्हा ते काढून माझ्याविरोधात कारवाई करण्याचा घाट घातला जात असल्याची भितीही लाड यांनी व्यक्त केली आहे.