महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलिसांना दहा मिनिटे बाजूला करा, अकबरुद्दीन ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो - नितेश राणे - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनचे तेलंगाणातील आमदार अकबरुद्दीन ओवेसी

अजान आणि हुनमान चालीसावरुन ( Azaan Vs Hanuman Chalisa ) महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेले आहे. त्यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनचे तेलंगाणातील आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी ( AIMIM MLA Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

MLA Nitesh Rane criticizes AIMIM MLA Akbaruddin Owaisin in a tweet
अकरबुद्दीन ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो - नितेश राणे

By

Published : May 13, 2022, 12:35 PM IST

Updated : May 13, 2022, 12:59 PM IST

मुंबई - अजान आणि हुनमान चालीसावरुन ( Azaan Vs Hanuman Chalisa ) महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेले आहे. त्यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनचे तेलंगाणातील आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी ( AIMIM MLA Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी ट्विट वरून उत्तर देत आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे.

अकबरुद्दीन ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो - नितेश राणे

काय आहे नितेश राणेंचे ट्विट - मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..

याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!

या कारट्या ओवेसीला माहीत आहे की,

मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये 'नामर्दांचे सरकार आहे'...

याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!

अशा पद्धतीचे ट्विट करत नितेश राणे यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांना ठणकावले तर आहेच परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारला नामर्दांचे सरकार म्हटले आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या भाषणानंतर राज्य सरकारने कुठलेही पाऊल उचलले नसल्याकारणाने नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, या ओवेसीला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर, आम्ही शिवरायांचे मावळे नाही, असेही म्हटले आहे.

अकबरुद्दीन ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो - नितेश राणे

काय म्हणाले अकबरुद्दीन ओवेसी? -कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात, पण वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत. तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही. मी इथे कोणाला उत्तर द्यायला आलो नाही. मी कोणाला वाईट बोलायला आलो नाही आहे, तसं करण्याची मला गरज देखील नाही. असे म्हणत अकबरुद्दीन ओवेसींनी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीका केली. मनसेचे संसदीय प्रतिनिधीत्व शुन्य आहे, यावरुन आमदार ओवेसींनी राज यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'आमचा तरी एक खासदार आहे. तुम्ही तर बेघर आहात, तुम्हाला काय उत्तर देणार. ज्याला घरातून बाहेर काढल आहे, त्याला काय उत्तर द्यायचं', असा टोमणा त्यांनी राज ठाकरे यांना मारला. आपल्या भाषणात शेवटी हिंदुस्तान जिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे. या देशात आपण प्रेमाने राहू या, असे सांगत ज्याला कुणाला वाटत असेल आम्ही घाबरू, पण ऐकून घ्या आम्ही घाबरणार नाही. असा इशारा देत आमदार ओवेसी म्हणाले, इस्लाम आधी संपला नाही, मग आता कोण संपवणार? असा सवाल अकबरुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा - Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेब कबर भेट; वाचा संजय राऊतांसह कोण काय म्हणाले...

Last Updated : May 13, 2022, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details