मुंबई - मुलुंडमध्ये करोडो रुपये खर्च करून सिडको मार्फत उभारलेल्या कोव्हिड सेंटर येथे अपुऱ्या वैद्यकीय टीम, तसेच आयसीयू बेड व डायलिसिस बेड यांची अपुरी सुविधा आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये तातडीने सर्व सुविधांची पूर्तता करावी करण्याची मागणी भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच कोविड सेंटरच्या कामात दिरंगाई व भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुलुंडच्या कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार; भाजपा आक्रमक - आमदार मिहिर कोटेचा
मुलुंडध्ये करोडो रुपये खर्च करून सिडको मार्फत उभारलेल्या कोव्हिड सेंटर येथे अपुऱ्या वैद्यकीय टीम, तसेच आयसीयू बेड व डायलिसिस बेड यांची अपुरी सुविधा आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये तातडीने सर्व सुविधांची पूर्तता करावी करण्यची मागणी भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

त्यांनी स्वत: या सेंटरला भेट दिली. त्यानंतर धक्का बसल्याचे कोटेचा यांनी सांगितले. लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी कोणतीही वैद्यकीय डॉक्टर्सची टीम उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या हॉस्पिटलमध्ये सिडकोने दिलेल्या आदेशानुसार ११ कोटी खर्च करत १५६० आयसोलेशन बेड, २१५ आय. सी. यू. बेड , ७५ डायलेसियस बेडची व्यवस्था ८ जून २०२०पर्यंत पूर्ण करायची होती. आज एका महिन्यानंतरही परिस्थिती 'जैथे थे' आहे. लोकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्याची किंमत भरमसाठ आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च केलेल्यानंतरदेखील परिस्थिती न सुधारल्याने आता पैशांचा हिशेब भाजपाने मागितला आहे.
'व्हेंटिलेटरवर धूळ बसलीय'
व्हेंटिलेटर काळाची गरज असताना मुलुंड मधील रुग्णांसाठी फक्त ४५ व्हेंटिलेटरची व्यवस्था महापालिकेकडून टी वॉर्डसाठी करण्यात आली. परंतू ते अद्याप धुळ खात पडले आहेत. हे ४५ व्हेंटिलेटर व कोविड सेंटरमधील आयसीयू व डायलेसिस बेडची व्यवस्था वेळेत झाली असती, तर आज अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे कोटेचा म्हणाले.
पी. एम. केअर फंडमधून आलेले ४०० व्हेंटिलेटर तसेच पडले आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते काहीच उत्तर देत नाहीत. यामधून शासनाची दिशाहीनता, लोकांना सुविधा देण्यात असमर्थता दिसून येते.