मुंबई - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे. सेनेच्या आमदार तसेच प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी आमच्याकडे संबंधित प्रकरणाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. 2014 ला काय झाले, यापेक्षा आता पुढे काय करायचे, याचा विचार केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे स्पष्टीकरण; आमदार मनीषा कायंदे माध्यमांसमोर
एका वृत्तसंसंस्थेला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखत दिली. यावेळी विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेसोबत आघाडी करण्यामागील कारण त्यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना चव्हाण यांनी 2014 मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. यावर सेनेच्या प्रवक्त्याचे स्पष्टीकरण आले आहे.
एका वृत्तसंसंस्थेला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखत दिली. यावेळी विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेसोबत आघाडी करण्यामागील कारण त्यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना चव्हाण यांनी 2014 मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. भाजपाला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट होते, असे त्यांनी म्हटले. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उत्सुक नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतल्याची माहिती त्यांनी दिली.